(TET Recruitment 2023 Maharashtra) नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे TET परीक्षा (TET Recruitment 2023 Maharashtra) लवकरच विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून आयोजित केला जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही लवकरच येणार आहे. या परीक्षेसाठी प्रक्रिया चालू झालेली आहे . पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टीईटी 2023 आता लवकरच होणार आहे . या परीक्षेसाठी अर्ज करण्याची वेळ ही 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान आहे. आठ फेब्रुवारी फ्रॉम भरण्याची शेवटची तारीख आहे त्या अगोदर तुम्ही आवर्जून फ्रॉम भरून घ्यावा त्यानंतर परीक्षा ही 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे येत्या तीन महिन्यांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. टी ई टी या परीक्षेच्या माध्यमातून आता महाराष्ट्र शासन 30 हजार शिक्षक पदे भरणार आहे. अशी घोषणा आपले उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे शिक्षक होऊन देशाचे भविष्य घडवण्याचे त्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यावा कारण त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
ज्या उमेदवारांना टीईटी परीक्षा (टीईटी शिक्षक भरती परीक्षा २०२३. ) द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे कारण अंतिम तारीख ही आठ फेब्रुवारी आहे. या भरतीमध्ये परीक्षेसाठी आपल्याला दोन घटकांवर अधिक लक्ष घालायचे आहे ते म्हणजे अभियोग्यता व बुद्धिमत्ता. अभियोग्यतेला एकूण गुण हे 120 आहेत आणि 120 प्रश्न आहेत. यानंतर बुद्धिमत्तेचा विचार केल्यास 80 गुण आहेत व 80 प्रश्न आहेत असा एकूण 200 गुणांचा अभ्यासक्रम आहे आणि एकूण प्रश्न ही 200 आहेत. मित्रांनो अधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता धन्यवाद !